मणिपूरचे यांनी मीराबाई चानू हिला राज्य सरकारकडून म्हणून एक कोटी रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केलीय. तसंच मुख्यमंत्र्यांनी या राष्ट्रकन्येला नोकरी देण्याचंही आश्वासन दिलंय.
मीराबाई तिकीट चेकिंग इन्स्पेक्टर
मीराबाई चानू भारतीय रेल्वेमध्ये सध्या तिकीट चेकिंग इन्स्पेक्टर म्हणून काम करते. ऑलिम्पिक यशानंतर मुख्यमंत्र्यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ‘यापुढे तुम्हाला रेल्वे तिकीट चेकिंग करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला योग्य ती नोकरी दिली जाईल’ असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावर, मीराबाईनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सोबतच, ‘तुमच्यासाठी एक कोटी रुपये वेगळे ठेवण्यात आले आहेत. इम्फाळला पोहचल्यानंतर तुम्हाला हे दिले जातील’, असंही मुख्यमंत्र्यांनी मीराबाईला मोठ्या आत्मियतेनं म्हटलं.
याशिवाय, शिक्षण मंत्री ए राजेन यांच्याकडूनही मीराबाईला तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मीराबाईनं सर्वांचे आभार मानून घरी परतल्यानंतर सर्वांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.
भारतकन्येवर कौतुकाचा वर्षाव
४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनंस्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण २०२ किलो वजन उचलून ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केलं.
मीराबाईच्या या यशावर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह यांच्याकडूनही तिला कौतुकाची थाप मिळालीय. देशासाठी हा एक अभिमानाचा क्षण असल्याची भावना या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times