पुणे: पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी व जिल्ह्यातील एकूण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेले सातारा जिल्ह्याकडं निघालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात खराब हवामानाचा अडथळा आला आहे. मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारं हवाई दलाचं हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याला परतलं आहे. (CM )

मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यासाठी ते हेलिकॉप्टरनं साताऱ्याला निघाले होते. खराब हवामान व कमी दृश्यमानतेमुळं कोयनानगर येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही. त्यामुळं तिथून हेलिकॉप्टर पुण्यात परतलं आहे. हवामानाचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री पुन्हा साताऱ्याला रवाना होतील. हवामान ‘जैसे थे’ राहिल्यास ते मुंबईला येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

असा होता दौरा:

सर्वप्रथम मुख्यमंत्री दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून कोयनानगर हेलिपॅडवर उतरणार होते. तिथून कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस करण्याचं नियोजन होतं. याशिवाय, जिल्हा प्रशासनाची आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, खराब हवामानानुळं ते होऊ शकलं नाही.

अजित पवार आज सांगलीत

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. पलूस येथील पुरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली व पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे, याची माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना अजित पवार यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here