सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूल कमकुवत असल्याने मोठ्या वाहनांना पुलावरून वाहतुकीस बंदी कायम आहे. पण वाहतूक सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला दणका दिला आहे. प्रचंड वित्तहानी केली असून आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचा पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला होता.
पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन होता. नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती.
सध्या पावसाचा जोर कमी झाला असून नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल होता. पण सध्या वाहतूक सुरू झाली असून नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times