जिल्ह्यातील सोनई येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार, न्या. नरेंद्र चपळगावकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री राहीबाई पोपेरे आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांचे भाषण झाले. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी काही जणांकडून त्यांच्यावर टीका होत आहे, तर सर्व स्तरांतून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. इंदोरीकर महाराजांवर होणाऱ्या टीकेवर पवार यांनी आपलं मत मांडलं. वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या इंदोरीकर महाराजांनी तरूण पिढीला दिशा देण्याचं काम सातत्यानं केलं आहे. त्यामुळं एखादा शब्द चुकला म्हणून त्यांना धारेवर धरता कामा नये, असं ते म्हणाले.
‘गावांची एकजूट हे अवघड काम आहे. लोकांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. विशेषतः तरूण पिढी सुधारली पाहिजे. पूर्वी विश्वासाचे वातावरण होते. रात्री-अपरात्री मुली सुरक्षित होत्या. आता दिवसासुद्धा आई-वडिलांना चिंता वाटते. हे वातावरण बदलण्यासाठी चांगले संस्कार हवेत. ते काम करत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे एखादा शब्द तोंडून गेला तर, किती लावून धरायचे. ही परंपरा पुढे सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी पुढे चालत राहणे आवश्यक आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times