आज आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. २६ जुलैच्या महापुराचा दाखला देत शिवसेनेवर टीका केली आहे. आज २६ जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. २६ जुलै २००५ च्या पुराला आज १६ वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एवढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. त्यामुळे मुंबईची स्थिती अशी आहे की, दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर’ असा टोला भाजपा आशिष शेलार यांनी लगावला आहे.
कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कधी २० हजार , कधी ३० हजार कधी ३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला. गेल्या १६ वर्षात सरासरी २० हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी धरला तर १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा अर्थसंकल्पीय निधी खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय आहे? मग हे पैसे गेले कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
‘चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? त्यावेळी चितळे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्याचे काय झाले? मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधीशांना द्यावी लागणार आहेत. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम करेल,’ असं अँड आशिष शेलार यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times