सिंधुदूर्ग : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पाहणी केली. कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठ, सुखनदी किनाऱ्यावरील भातशेती, कणकवली – नरडवे मार्गावरील नाटळ आणि कुंभवडे गावांना जोडणारा मल्हारी पूल कोसळला त्यामुळे नाटळ, दारिस्ते, दिगवळे, नरडवे या गावांचा संपर्क पूर्णतः तुटला त्या पुलाची पहाणी आज पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी व खारेपाटण मधील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. शक्य असणारी मदत आजच जाहीर करण्याचे आश्वासन उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्गच्या नुकसानी बाबत कोकण आयुक्तांनी काल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असून राज्यात इतर भागातील नुकसानग्रस्त भागांना जी मदत किंवा पॅकेज जाहीर होईल त्यात सिंधुदुर्गचा ही समावेश असेल असे त्यांनी यावेळी माध्यमांना सांगीतलं.

बांदा गाळेल याठिकाणी एक युवक डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्याच प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असून जिल्ह्यातील कणकवली मधील दिगवळे रांजणवाडी येथे एका घरावर दरड कोसळून एक मृत्यू महिलेच्या नातेवाईकांना ४ लाख तर दोघे जखमी आहेत. त्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती सामंतांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here