अमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा मित्र पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) आहे. मात्र, या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान रिपब्लिकन पक्षाला मिळत नाही अशी नाराजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे.

सत्तेत 5 टक्के वाटा मिळावा पण तोही मिळाला नाही, याचा मला खेद वाटतो असेही त्यांनी सांगितले. अमरावतीत जोगेंद्र कवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. तीन पक्षाच्या सरकारमध्ये घटक पक्ष आम्ही आहोत. पण तरीदेखील उचित प्रतिनिधित्व मिळालं नाही. आमची अपेक्षा पुर्ती झाली नाही, आता महामंडळ, राज्य स्तरीय समीती व जिल्हा स्तरिय समिती आम्हाला मिळाल्या पाहिजे. कारण, निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत आम्ही देखील सभा घेतल्या.

यामुळे सत्तेत योग्य व सन्मान जनक वाटा मिळावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. माजी राज्यपाल स्वर्गीय रा सु गवई यांच्या स्मृती व पुष्पहार अर्पण करण्यासाठी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलली. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारल्याने शिवसेनेने आपला रस्ता वेगळा केला. या वाटाघाटीत बहुमत असून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. या आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान रिपब्लिकन पक्षाला मिळत नाही अशी नाराजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त असून सत्तेत 5 टक्के वाटा मिळावा पण तोही मिळाला नाही याचा मला खेद वाटतो असेही त्यांनी सांगितले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here