शिवसेना नेते आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि शिवसेनेच्या इतर कार्यकर्त्यांनी प्रा. केंद्रे यांना मारहाण केल्याचा भाजपचा दावा आहे. केंद्रे यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
प्रा. गोविंद केंद्रे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला. केंद्रे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार दिली असून याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडमोडे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, शहर सरचिटणीस समीर राजुरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप कार्यकर्ते प्रा. केंद्रे यांच्यावरील हल्ल्याचा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध करत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडमोडे यांनीही शिवसेनेवर आक्रमक टीका करत संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. या मारहाणीप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times