INDvsSL : कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या युवा भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकेतील पहिला सामनाही टीम इंडियाने जिंकला आहे. 4 विकेट घेणारा भारतीय संघाचा उप-कर्णधार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या सामन्याचा मानकरी ठरला. सामना संपल्यानंतर भुवनेश्वरने फिरकीपटू य़ुजवेंद्र चहलबाबत मोठी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला की, तो चहलवर नाराज झाला आहे. चहल टीव्हीवरील संभाषणादरम्यान भुवीने ही प्रतिक्रिया दिली. भुवी पुढे म्हणाला की, चहलवर मी नाराज आहे. कारण त्यानं यापूर्वी कधीही त्याच्या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं नाही. मी पहिल्यांदाच त्याच्या या कार्यक्रमात आलो आहे. ड्रेसिंगरुममध्ये मी अनेकदा त्याला विनंती केली होती, पण तरीही त्यानं मला बोलावलं नव्हतं.’

चहलने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ‘तीन अष्टपैलू खेळाडू एका फोटोमध्ये. द थ्री मस्केटिअर्स’ असं कॅप्शनही त्याने या फोटोला दिलं आहे. या सामन्यात चहलने एक विकेट घेतली, तर भुवीने 4 जणांना तंबूचा रस्ता दाखविला.

सामना संपल्यानंतर चहल म्हणाला की, टीममध्ये अंतर्गत स्पर्धा इतकी जोरदार आहे की, यामुळे भारतीय संघ अधिक चांगला तयार होईल. संघात निश्चितच एक निरोगी स्पर्धा आहे. जर आपल्याकडे 30 खेळाडू आहेत, तर आपल्याकडे निश्चितच गुणवत्ता आहे. सर्व फिरकीपटू चांगली गोलंदाजी करीत आहेत. एक फिरकीपटू म्हणून मला वाटते की, दोन खेळाडू असे आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आयपीएलमध्येही चांगले खेळले आहेत. त्यामुळे हे खेळाडू नक्कीच आपली जागा घेतील.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here