‘जिथे मुख्यमंत्री पोहोचले नाहीत तिथे मनसे पोहोचली,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक सातारा जिल्ह्यात मदत मदतीसाठी धावून आले आहेत. तसेच कोयनानगर येथील दरडी कोसळलेल्या गावांमध्ये भेट देऊन प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत, असं आश्वासन देखील संदीप देशपांडे यांनी गावकऱ्यांना दिले.
नेमकं काय घडलं?
मागील पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ३७ जणांचा बळी गेला आहे, तर पाटण तालुक्यातील भूस्खलनातील पाच आणि वाई व जावळी तालुक्यातील बेपत्ता झालेल्या चौघा नागरिकांचा शोध अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे साताऱ्याला आले होते. मात्र त्यांना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर लँड न झाल्याने परतावे लागले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध अद्यापही सुरूच आहे. अजूनही अंदाजे पाच लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी यंत्रणा जोरदार प्रयत्न करत आहे. स्थानिक स्वयंसेवकांसह एनडीआरएफची टीमही दिवस रात्र झटत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times