जळगाव: क्रिकेटच्या वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून येथे रविवारी रात्री दहा वाजता शिवसेनेचे उपमहापौर यांचा पाठलाग करून गोळीबार करण्यात आला. रस्त्यावर व घराजवळ येऊन पिस्तूलातून चार राऊंड फायर केल्याची फिर्याद उपमहापौर पाटील यांनी दिल्यावरून रामानंद पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला तात्कालीक वादातून झाला की, पूर्ववैमन्यस्यातून या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणास दीड लाख रुपयांच्या उधारीच्या वसुलीची किनार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी (वय २४) व उमेश पांडुरंग राजपूत (वय २१, दोघे रा. ) या दोघांन अटक करण्यात आली असून महेंद्र पांडुरंग राजपूत, भुषण बिऱ्हाडे यांचा शोध पोलीस घेत आहेत. ( )

वाचा:

रविवारी दुपारी चार वाजता पिंप्राळा परिसरात महेंद्र राजपूत, जुगल बागुल, बिऱ्हाडे, मंगल राजपूत, उमेश राजपूत तसेच नितीन राजपूत, पंकज पाटील, सागर पाटील, नंदू कोळी, राजू ठाकुर हे तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी एका तरुणास बॉल लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद सुरू झाला. यातील एका गटात उपमहापौर पाटील यांचे भाऊ हे सहभागी होते. वाद वाढत जावून दोन्ही गट एकमेकांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील हेसुद्धा वाद सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले होते. वाद मिटवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस ठाण्यात देखील दोन्ही गटातील तरुण हाणामारी करण्याच्या प्रयत्नात होते. अखेर याप्रकरणी दोन्ही गटातील तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरुन परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्यानतंर दोन्ही गट माघारी गेले.

वाचा:

रस्ता अडवून धमकी; पाठलाग करुन गोळीबार

कुलभूषण पाटील यांना रात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा रात्री ९.४५ वाजता उपमहापौर पाटील हे सोमानी मार्केट स्टॉप परिसरातून जात असताना महेंद्र राजपूत, जुगल बागुल, बिऱ्हाडे, मंगल राजपूत, उमेश राजपूत यांनी त्यांचा रस्ता अडवला. दुपारी झालेले भांडण किरकोळ होते, आम्हाला तुलाच ठार मारायचे आहे, अशी धमकी देत या गटाने थेट पिस्तूल रोखून उपमहापौर पाटील यांच्या दिशेने गोळीबार केला. यातून स्वत:चा बचाव करीत पाटील यांनी घराकडे पळ काढला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून घराकडे येऊन घरावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून पाटील बचावले. घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना त्यांनी दिली. यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलिसांचे पथक पाटील यांच्याघरी पोहचले. नागरीकांकडूनही त्यांनी माहिती घेतली.

वाचा:

पुंगळ्या नाही पण जिंवत काडतुस सापडले

सुमारे २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी पाटील यांच्या घराबाहेरचा परिसर पिंजून काढला. यावेळी तेथे गोळीबार झालेल्या काडतुसाच्या पुंगळ्या मिळून आल्या नाहीत तर एक जीवंत काडतूस पोलिसांना आढळले. पंचनामा करून पोलिसांनी काडतूस जप्त केले आहे. उपमहापौर पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिल्यानतं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना पूर्ववैमनस्यातून झाली आहे की, तात्कालीक वादातून या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहेत. तर संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here