राहुल गांधी हे स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेच्या दिशेने निघाले. यावरून राजकारण तापलं. राहुल गांधी हे ट्रॅक्टरने संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच ज्या ट्रॅक्टरने ते संसदेच्या ठिकाणी आले तेही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
राहुल गांधींचीही स्टंटबीजी आहे. त्यांना गाव, गरीब, शेतकऱ्यांबद्दल कुठलाही अनुभव नाही आणि वेदनाही नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात याच कायद्यांचा उल्लेख होता. मग राहुल गांधी त्यावेळी खोटं बोलत होते की ते आता खोटं बोलतायेत? असा सवाल नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.
राहुल गांधी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या याच चुकीच्या वागण्याने ते काँग्रेसमध्येही सर्ममान्य नेते राहिले नाहीत, असा टोला तोमर यांनी लगावला.
आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडे कुठलाही प्रस्ताव नाहीए. यामुळेच ते चर्चेसाठी पुढे येत नाहीए. भारत सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे. कायद्यातील प्रत्येक तरतुदीवर बोलण्यास तयार आहोत, असं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना नंतर पोलिसांनी सोडलं. यात काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार दीपेंद्र हुड्डा, प्रताप सिंह बाजवा आणि पक्षाच्या इतर खासदारांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times