नवी दिल्लीः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उद्या भारतात दाखल होत आहेत. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनरही येत आहेत. त्यांच्या अँड्र्यू एअर फोर्स तळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण घेतलंय. हे विमान उद्या सकाळी ११.४० पर्यंत अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर उद्या दाखल होत आहे. पाहूया कसा आहे त्यांचा संपूर्ण कार्यक्रम…

सकाळी ११.४० वाजता
– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ अहमदाबाद विमानतळावर उतरेल. इथे त्यांचे काही फोटोही काढण्यात येतील.

दुपारी १२.१५ वाजता
– अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला ट्रम्प भेट देतील.

दुपारी १.०५ वाजता
– मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात सहभाग घेतील.

दुपारी ३.३० वाजता
– आग्र्याला रवाना होणार

संध्याकाळी ४.४५ वाजता
– आग्रा विमानतळावर उतरणार

संध्याकाळी ५.१५ वाजता
– ट्रम्प ताजमहाल बघायला जाणार

संध्याकाळी ६.४५
– दिल्लीला रवाना होणार

संध्याकाळी ७.३० वाजता
– दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरणार

मंगळवार, २५ फेब्रुवारी

सकाळी १० वाजता
– राष्ट्रपती भवनात स्वागत होणार

सकाळी १०.३० वाजता
– राजघाटः महात्मा गांधीच्या समाधीवर आदरांजली वाहणार

सकाळी ११ वाजता
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हैदराबाद हाउसमध्ये बैठक करणार

दुपारी १२.४० वाजता
– हैदराबाद हाउसमध्ये पत्रकार परिषद करणार

संध्याकाळी ७.३० वाजता
– राष्ट्रपती भवनला जाणार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत बैठक करणार

रात्री १० वाजता
– अमेरिकेला रवाना होणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here