जम्मूः पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत असून गोळीबारात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलीसचे महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी आणि शांतता भंग करण्यासाठी पाककडून गोळीबार केला जातोय. पाक आपल्या नापाक प्रयत्नांमध्ये कधीच यशस्वी होणार नाही. कारण आपण कडोकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. मात्र, काश्मीर खोऱ्यात अद्याप जवळपास २४० ते २५० दहशतवादी लपून असल्याचं ते म्हणाले.

काश्मीरमध्ये दहशतावाद्यांची घुसखोरी झाली. पण सुरक्षा दलांनी राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहीमांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. पाककडून शस्रसंधी उल्लंघनेचं प्रमाण वाढल्याने आम्ही आणखी सतर्क झालो आहोत. आम्ही घुसखोरी अनेक प्रयत्न उधळून लावलेत, असं दिलबाग सिंह यांनी सांगितलं.

तरुणांमधील दहशतवादाचं आकर्षण घटलं

आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच मनसुबे उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचं तरुणांमधील आकर्षण कमी झालं आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आधीपासूनच अनेक योजना आखलेल्या आहेत. त्यावर कामही सुरू आहे, असं दिलबाग सिंह म्हणाले.

दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वेळेवर दिल्याने दिलबाग सिंह यांनी नागरिकांचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिक हे सहकार्य कायम ठेवतील. कधी-कधी नागरिक संशयावरून माहिती घेऊन येतात. हे सतर्क नागरिकांचं लक्ष आहे. मिळणाऱ्या माहितीवरून आम्ही कारवाई करतो. यामुळे दहशतवाद्यांविरोधातील आमच्या मोहीमांना यश येतं. दहशतवाद्याविरोधातील मोहीमेचा वेग आणखी वाढवण्यात येणार आहे, असं दिलबाग सिंह यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here