उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार, खासदार यांनीही आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्वीटची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी घडत असलेल्या घडामोडींचा तो व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल ठामपणे सुरू असल्याचा ग्वाही देणारा हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओसोबतच संजय राऊत यांनी उद्धव यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मागील अडीच दशकातील शिवसेनेच्या प्रत्येक वाटचालीचे संजय राऊत हे जवळचे साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना ठामपणे साथ देणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत हे एक आहेत. त्या नात्याचं व मित्रत्वाचं प्रतिबिंब राऊत यांनी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये पडलं आहे. ‘अखंड साथ. अतूट नाते…’ असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, तो दिवस लवकरच उगवेल,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
वाचा विशेष लेख:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times