साखळी येथील अपंग शेतकरी प्रदिप हिवाळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. यांनी यावर्षी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, दूषित हवामानामुळे शेतातील तन वाढल्यामुळे त्यांनी गावातीलच शाश्वत कृषी केंद्रावरून रॅमसाईड क्रॉपसायन्स कॉर्पोरेशन या कंपनीचे इमिजादम या तणनाशकाची फवारणी केली असता दोन दिवसानंतर याचा उलट परिणाम सोयाबीनवर दिसून आला. यामुळे या बळीराजाच्या डोळ्यातलं पाणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
शेतकऱ्यांचे उभे पीक वाळले. त्यामुळे या शेतकऱ्याने संबंधित कृषी केंद्र मालकाला व कृषी अधिकाऱ्यांना तोंडी तक्रार केली आहे. त्यामुळे आता या अपंग शेतकऱ्याने कृषी केंद्रावर कडक कारवाई करून कृषी केंद्र सील करावे व आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times