मिळालेल्या माहितीनुसार, विदेश हा महापालिकेत पाण्याचा टँकर चालवितो. गत काही दिवसांपासून त्याचा काऱ्या याच्यासोबत वाद सुरू आहे. शनिवारी रात्री विदेश हा इंदोरा पाण्याच्या टाकीजवळील भिंतीवर बसला होता. यावेळी काऱ्या व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी विदेश याला शिवीगाळ केली. काऱ्या याने विदेश याच्या दंडात चाकू खुपसला. त्यानंतर काऱ्या व त्याचे साथीदार पसार झाले. दंडात खुपसलेल्या चाकूसह विदेश हा जरीपटका पोलीस ठाण्यात गेला. त्याला बघताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या दंडातील चाकू काढला. विदेश याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून काऱ्या याला अटक केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times