रत्नागिरी : कोकणातील रायगड, रत्नागिरी, चिपळूण या जिल्ह्यात महापूरामुळे हाहाकार माजला होता. दरड कोसळून अनेक भीषण दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांच्या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य अखेर सोमवारी थांबवण्यात आलं. चिपळूण, महाडसह महापुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यातच आता चिपळूण वनविभागाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

महापूर ओसरला आहे. पाऊसही थांबला आहे. पण पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मासे, मगर आणि साप असे वाहून शहरांमध्ये आले आहेत. त्यामुळे प्राणी साप दिसले तर आम्हाला कळवा असं आवाहन चिपळूण वनविभागाकडून करण्यात आलं आहे. महापुरानंतर आता जिवंत अथवा मृत पक्षी, प्राणी, साप घरात परिसरात दिसण्याची शक्यता आहे. यासाठी वनविभाग चिपळूण तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, सध्या महापूर ओसरत असल्याने घरामध्ये किंवा आसपासच्या परिसरात वन्य प्राणी, पक्षी, साप जिवंत किंवा मृत अवस्थेत आढळल्यास वन विभागाचा टोल फ्री – 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा.

इतकंच नाहीतर चिपळूण कार्यलयातील मदत केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. चिपळूण तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे…

– राजेश्री कीर (वनक्षेत्रपाल चिपळूण) 9404908585

– राजाराम शिंदे ( वनरक्षक चिपळूण 9765787578

– निलेश बापट (मानद वन्यजीव रक्षक चिपळूण) 9552593898

– दत्ताराम सुर्वे (वनरक्षक रामपूर)8888967284

दरम्यान, पूरग्रस्त चिपळूमध्ये साफसफाईचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पूरग्रस्त भागाची वेगाने स्वच्छता व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेची आधुनिक स्वच्छता यंत्रणा सोमवारी चिपळुणात दाखल झाली व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. खेडमध्येही विविध खासगी व सरकारी यंत्रणांचा वापर करून स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here