मिळालेल्या माहितानुसार, पत्नी आणि मुलं घरात नसताना या संधीचा फायदा घेत तरुणाने आत्महत्या केली. नालासोपारा गुलमोहर सोसायटीमध्ये राहणारा राकेश जाधव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. राकेश हा व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता. गेले अनेक महिने आर्थिक अडचणींचा सामना करत होता. तो इलेक्ट्रिकची कामं घ्यायचा खरी पण करोनाच्या संकटात हाताला काम नव्हतं. त्यामुळे घराचे हप्ते थकले होते.
अशात बँकेचे येणारे फोन यामुळे राकेश हा चिंतेत होता. पण यावर कुठलाही उपाय न सापडल्याने राकेश थेट गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या टोकाच्या भूमिकेमुळे आज कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी राकेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणात त्याच्या कुटुंबाचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर करोना भीषण काळ सुरू आहे. यामुळे प्रत्येकावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशात खचून जात आपल्या जीवाची बाजी न लावता आपल्या संकटांचा सामना करावा यातच सगळ्यांचं भलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times