संजू ब्रह्मे (रा. नंदनवन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे तर, महिमा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती बीए द्वितीय वर्षाला शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४मध्ये महिमा ही मध्य प्रदेशातील लांजी येथे राहात होती. तिचे संजू याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्याविषयी नातेवाइकांना समजले. नातेवाइक तिला घेऊन नागपुरात आले. तिने संजूसोबत संबंध तोडले. काही दिवसांनी संजूही नागपुरात आला. नागपुरात आल्यानंतरही तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. संबंध न ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणीही त्याने मागितली. त्यामुळे १८ फेब्रुवारीला महिमाने विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. संजूने खंडणी मागितल्यामुळे महिमाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संजूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times