नांदेड : आपण समाजामध्ये बैल, श्वान, म्हैस, इत्यादी पाळीव प्राण्यांची अंत्यसंस्कार पहिली असतील पण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरमाळ येथील एका प्राणिप्रेमी शेतकऱ्याने लळा लावलेल्या राजा नावाच्या कोंबड्याची विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला निरोप दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अंत्यसंस्कारात अनेक गावकरीही सहभागी होते.

दहा वर्ष मालकाला साथ देणाऱ्या राजा नावाच्या कोंबड्याला चार दिवसांपूर्वी मांजराने चावा घेतल्यानं कोंबडा जखमी झाला होता. या कोंबड्यावर बरेच उपचार करूनही कोंबडा वाचला नाही. गावांत सर्वत्र स्वच्छंद हुंदडत असलेला हा कोंबडा गावकऱ्यांना अत्यंत प्रिय होता.

लोक नेहमी त्याला भजे, मुरमुरे खायला देत असते. तोही मोठ्या आवडीने ते खायचा. हा कोंबडा मालक शंकर कोकलेचा लाडका होता. या राजाच्या अचानक जाण्यानं मालक आणि गावकऱ्यांना दुखः झालं आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत राजा या कोंबड्याची बँड-बाजा लावून अंत्ययात्रा काढली .

शंकर कोकले यांच्या शेतात खड्डा तयार करुन विधीवत अंत्यसंस्कार केले. राजाच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. सध्या करोनामुळे रक्ताच्या नात्यातल्या लोकांच्या अंत्यविधीस जाताना दिसत नाही. मात्र, दहा वर्षांत गावकऱ्यांची मनं जिंकणाऱ्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here