जालना : पैसा ही एक अशी गोष्ट आहे, ज्यापुढे सगळी नाती फिकी पडतात. असाच काळजाचा ठोका चुकावणारा प्रकार जालन्यामध्ये समोर आला आहे. जालना जिल्ह्यातल्या () अंबड तालुक्यातील झिरपी या गावातील वडील पंढरीनाथ भवर यांच्या नावावर असलेली दीड एकर शेती माझ्या नावावर करून द्या म्हणून वडिलांसोबत भांडण करुन सर्जेराव या त्यांच्या मुलाने त्यांना शेत जमिनीची रजिस्ट्रि करून न दिल्याचा राग मनात ठेवत मुलाने धक्कादायक कृत्य केलं आहे. ( for wealth in Jalna)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने वडिलांचा दोरीने गळा आवळून डोक्यात वार करत खून केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. झिरपी येथील ६५ वर्षीय पंढरीनाथ भवर यांचा मृतदेह शेतातील छपरात आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.

सर्जेराव असं आरोपी मुलाचं नाव आहे. गावकऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सर्जेराव हा आपल्या वडिलांना कोणीतरी मारल्याचा कांगावा करत होता. पण अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुग्रीव चाटे यांनी संशयावरून सर्जेरावची कसून चौकशी करीत पोलीसी खाक्या दाखवताच सर्जेराव याने आपणच वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे.

दीड एकर जमिनीचाच्या हव्यासापोटी जन्मदात्या वडिलांचा खून करण्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांत पटत नसल्याने पंढरीनाथ भवर हे शेतात एकटे रहात होते. वडिलांनी जमीन विकून न टाकता आपल्या नावावर करावी अशी मुलाची मागणी होती. तर वडील आपण जमीन विकून टाकणार असे म्हणायचे. त्यामुळे मुलाने हे आत्मघाती पाऊल उचलले व वडिलांचा कायमचा काटा काढला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here