गणपतरावांनी ५० वर्षाहून अधिक काळ सांगोला मतदारसंघाचे आमदार म्हणून लोकांची सेवा केली असून या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
गणपतराव देशमुख सन १९६२ साली सांगोला विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९७२ आणि १९९५ च्या दोन निवडणुका वगळता उर्वरित सर्वच निवडणुकांमध्ये सांगोल्याच्या जनतेने त्यांना निवडून दिले.
क्लिक करा आणि वाचा-
विधानसभेत कायम विरोधकांची भूमिका बजावणारे गणपतराव देशमुख सन १९७८ साली शरद पवार यांचे पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळात सामील झाले. त्यानंतर दुसऱ्यावेळी सन १९९९ साली काँग्रेस आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times