डोंगराला लागून असलेल्या गावांना स्थलांतरित करण्यात येऊन तेथील लोकांचे पुनर्वसन करण्याची मानसिकता शंभर टक्के झाली आहे, असेही पवार म्हणाले. पवार यांनी येथील बहुउद्देशीय सभागृहात घेतलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरआढावा बैठक घेतली. पुढील एका आठवड्यात जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान झालेली घरे आणि पडझडीचे पंचनामे पूर्ण करावेत. तसेच बाधित व वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मात्र तोवर न थांबता कामे तात्काळ सुरु करा, असा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
क्लिक करा आणि वाचा-
बोटी चांगल्या खरेदी करून त्यांचा योग्य असा वापर करा. गरज असणाऱ्या गावातच कामे करा, विनाकारण गावे वाढवू नका असेही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सुनावले. पुनर्वसनासाठी शासकीय जमीन देता येईल का, याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले. याबरोबरच जनतेनेही त्याला प्रतिसाद द्यावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा-
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर उद्या पाटण दौर्यावर
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गुरुवारी २८ रोजी सातारा जिल्हा दौर्यावर येत आहेत. आपल्या दौर्यात पाटण तालुक्यातील आंबेघर, कोयनानगर येथे फडणवीस भेट देणार असून गुरुवारी ते जिल्ह्यात मुक्कामी थांबणार आहेत. सकाळी ८च्या सुमारास मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानातून मोटारीने ते कराड येथे येणार असून तेथून पाटण तालुक्यातील आंबेघर येथील भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
त्यानंतर कोयनानगर येथील प्राथमिक केंद्र शाळेत स्थलांतरितांची भेट घेणार आहेत. सायंकाळी ५च्या सुमारास अतिवृष्टीग्रस्त हुंबरळी परिसराला भेट देणार आहेत. रात्री कृष्णा विद्यापीठ येथे ते मुक्कामी थांबणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत दरेकरही दौर्यात सहभागी होणार असून तेही मुक्कामी थांबणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times