सांगली: स्वतःचा मुलगा सतत त्रास देत असल्याच्या कारणातून जन्मदात्या पित्यानेच मुलाचे मुंडके धडावेगळे करून त्याचे शरीर साथीदाराच्या मदतीने सांगोला तालुक्यातील बुदेहाळ तलावात टाकल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी (वय ४५, रा. ) आणि उत्तम मदने (वय २८, रा. कोळे, ता. सांगोला) या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दोघांनी (वय २१, रा. कवलापूर) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १५ जुलै रोजी खूनाची घटना घडली होती. ( )

वाचा:

याबाबत अधिक माहिती अशी की, १५ जुलै रोजी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोपान जनार्धन गडदे यांच्या मालकीच्या शेतीलगत असलेल्या बुद्धेहाळ तलावामध्ये सुमारे २५ ते ३० वर्षाच्या अनोळखी इसमाचा डोके नसलेले शरीर चटईमध्ये व शेडनेटमध्ये दोरीने मोठ्या दगडास बांधून टाकल्याचे आढळले होते. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खूनाची माहिती, मृतदेहाचे फोटो व त्याचे वर्णन सांगोला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी लगतच्या जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती. सोमवार दिनांक २६ जुलै रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार हे कवलापूर गावात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, कवलापूर गावातील विजय विलास पवार (वय २१, रा. कवलापूर) हा काही दिवसापासून गावातून गायब आहे. त्याचा खून झाला असून, हा खून त्याचे वडील व त्यांच्या साथीदारांनी केला असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीप्रमाणे विजय पवार याच्या घरी जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी विलास पवार हे घरी मिळून आले. त्यांना मुलगा विजय पवारबाबतची माहिती विचारली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली. कबुली जबाबात विलास पवार यांनी सांगितले की, माझा मुलगा विजय हा घरात मला व माझ्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. त्याचा राग मनात धरून मी साथीदारासह त्याचा खून केला. दोघांनी मिळून मृतदेह सांगोला येथील बुद्धेहाळ तलावामध्ये टाकला.

वाचा:

या गुन्ह्याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात खात्री केली असता तेथे खून व खूनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यावेळी पोलीस निरीक्षक जगताप यांना या घटनेची सविस्तर माहिती देऊन गुन्ह्यातील आरोपी, गुन्ह्यात वापरलेले वाहन व अहवालासह पुढील तपास वर्ग करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, बाळकृष्ण गायकवाड, रमेश कोळी, कपिल साळुंखे, महेश जाधव आणि आकाश गायकवाड यांनी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here