रत्नागिरी: शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी शिंदे यांचे आभार मानले आहेत. ( )

वाचा:

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात २० फुटांपर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी तातडीचा २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे ५ अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचेदेखील एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

वाचा:

चिपळूण शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळदेखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असंही शिंदे यांनी जाहीर केलं. चिपळूण शहराला नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणाऱ्या बोटी, लाइफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार , माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

दरेकर यांनी मानले शिंदे यांचे आभार

पूरग्रस्त चिपळूण शहरात तातडीने साफसफाई व्हावी म्हणून २ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्यात आणखी ५० लाख रुपये वाढीव दयावेत, अशी मागणी दरेकर यांनी नगरविकासमंत्र्यांकडे केली असून ही रक्कम देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. शहराच्या साफसफाईसाठी जाहीर केलेली ५० लाखांची मदत तोकडी असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here