बेंगळुरूः कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई ( ) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बोम्मी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. कर्नाटक भाजपची विधिमंडळ पक्षाची मंगळवारी संध्याकाळी उशिरा बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांनी बोम्मई यांच्या नावाची औपचारीक घोषणा केली. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे लोकप्रिय असलले बोम्मई हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत.

उत्तर कर्नाटकमधून येणारे लिंगायत नेता बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई हे येडियुरप्पांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गृह, कायदे, विधिमंडळ मंत्री म्हणून काम केलं होतं. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत येडियुरप्पा यांनीच्या त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आणि गोविंद करजोल, आर. अशोक, के. एस. इश्वरप्पा, बी. श्रीरामुलु, एस. टी. सोमेश्वर, पौर्णिमा श्रीनिवास यांनी बोम्मई यांच्या नावाला अनुमोदन दिलं. भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होताच बोम्मई यांनी येडियुरप्पांचे आशीर्वाद घेतले आणि इतर पक्ष नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

बोम्मई उद्या सकाळी ११ वाजता शपथ घेणार

राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. ते उद्या सकाळी २८ जुलैला ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधी समारंभ उद्या सकाळी ११ वाजता ग्लास हाउसमध्ये होईल. बुधवारी फक्त आपलाच शपथविधी होईल, असं बोम्मई म्हणाले. बोम्मई हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर येडियुरप्पांसोबत गेले होते.

बोम्मई यांचं पूर्ण बसवराज सोमप्पा बोम्मई, असं आहे. त्यांचं जन्म २८ जानेवारी १९६० मध्ये झाला. बोम्मई हे कुशल राजकारणी आणि अभियंता आहेत. ते आता कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री होतील. बोम्मई हे २००८ मध्ये शिग्गांव मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेवर ३ वेळा निवडून गेले. बोम्मई १९९८ आणि २००८ मध्ये दरम्यान कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य होते. बसवराज बोम्मई हे यापूर्वी येडियुरप्पांच्या चौथ्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री, कायदे आणि विधिमंडळ राज्यमंत्री महोते. त्यांनी हावेरी आणि उडुपी जिल्हा प्रभारी मंत्री म्हणूनही काम केलं.

जनता दलापासून राजकारणाला सुरवात

बसवराज बोम्मई यांनी २००८ ते २०१३ दरम्यान जलसंपदा आणि सहकार मंत्री म्हणून काम केलं. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली. बोम्मई हे उच्च शिक्षित आहेत. ते इंजीनिअर आहेत. व्यवसायाने ते शेतकरी आणि उद्योगपती आहेत. सिंचन योजनेत त्यांचे योगदान आणि कर्नाटकमधील सिंचानाच्या मुद्द्यावर त्यांचे कौतुक केले जाते. त्यांनी कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील शिग्गांवमध्ये देशातील पहिली १०० ट्केक ठिबक सिंचन योजना लागू केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here