नवी दिल्ली : भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण आता मनिकाला या पराभवानंतर अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण मनिकावर आता कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे प्रकरण नेमंक आहे तरी काय, पाहा…मनिकाकडून भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या अपेक्षा होत्या. पण मनिकाला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. मनिका जेव्हा खेळत होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घेतली नव्हती. यावेळी तिचे खासगी प्रशिक्षक टोकियोमध्ये दाखल झाले होते. पण त्यांना खेळाच्या ठिकाणी आयोजकांनी प्रवेश दिला नाही. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक हे सौम्यदीप रॉय आहेत. रॉय यांनी रॉय यांनी २०१६ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते, त्याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रॉय हे फक्त एकच प्रशिक्षक होते की ज्यांना टेबल टेनिसच्या खेळाडूंबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण मनिका आपले खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना घेऊन टोकियो येथे गेली होती. पण सन्मय यांना मनिकाबरोबर सराव करण्याची संधी दिली नाही आणि त्याचबरोबर जिथे स्पर्धा होणार होती तिथेही त्यांनी आयोजकांनी प्रवेश नाकारला होता. त्यानंतर मनिकाने स्पर्धा सुरु असताना राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांची मदत न घेतल्याचे पाहायला मिळाले.

टेबल टेनिस संघटनेने नेमकं काय सांगितलं, पाहा…भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव अरुण कुमार बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले की, ” मनिकाने शिस्त पाळलेली नाही, त्यामुळे या बेशिस्त वर्तनामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे. जेव्हा स्पर्धा सुरु होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांना आपल्या जवळ बसवायला हवे होते आणि त्यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेणे अपेक्षित होते. काही दिवसांमध्येच टेबल टेनिस महासंघाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये मनिकावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच या प्रकरणाची सत्यताही समोर येणार आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here