मुंबई : कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भार सोसणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी सलग ११ व्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे.

आज सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.

इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने दररोज सकाळी ६ वाजता कंपन्यांकडून किरकोळ विक्रीचे दर निश्चित केले जातात. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्यांकडून सकाळी ६ वाजता इंधन दर जाहीर केले जातात. जानेवारीपासून तेलाच्या किमतीत सरासरी ४५ टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here