लखनऊ : उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा मोठा घडलाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ हून अधिक जण जखमी आहेत.

रात्री जवळपास १२.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. लखनऊ – अयोध्या राष्ट्रीय महामार्ग २८ वर कल्याणी नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या बाजुला उभ्या असणाऱ्या एका बसला मागून अतिशय वेगानं आलेल्या एका ट्रकनं जोरदार टक्कर दिल्यानं हा अपघात घडला.

या धडकेमुळे रस्त्यावर उभ्या राहिलेल्या आणि बसमध्ये निद्रीत अवस्थेत असलेल्या तब्बल १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर २५ हून अधिक जण जखमी आहेत. मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

या अपघाताला बळी पडलेले अनेक नागरिक मजूर होते. पंजाबमधून बिहारकडे ते निघाले होते. परंतु, रस्त्यावरच बस अचानक बंद पडली. त्यामुळे सर्व मजूर बसचं काम होऊन ती सुरू होण्याची वाट पाहत होते. काही जण बसमध्येच बसून होते तर काही जण बसच्या खाली उतरून रस्त्याच्या एका बाजुला उभे होते. मात्र, भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं या सर्वांनाच अक्षरश: चिरडलं.

जखमींवर बाराबाकीच्या जिल्हा रुग्णालयाच्या ट्रामा सेंटर आणि मेडिकल कॉलेजसहीत इतर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशचे यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. आपल्या संवेदना पीडित कुटुंबीयांसोबत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here