चिपळूण: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच आता त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांना सर्वांसमक्ष गप्प केल्यानं चर्चा रंगली आहे. याबाबतची क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

चिपळूणमधील पाहणीच्या वेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यानं नारायणे राणे चांगलेच भडकले होते. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून झापले. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगू पाहत असताना, ‘सीएम, बीएम गेला उडत’ असं म्हणत राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं. ‘मी इथं बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ असं राणे म्हणाले.

वाचा:

राणेंच्या या दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते एका अधिकाऱ्याची कानउघडणी करताना दिसत आहेत. ‘आम्ही इथं फिरायला आलो आहे का? तुमचा एकही अधिकारी इथं कसा नाही? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही इथं दात काढताय? लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. विरोधी पक्षाचे नेते इथं आलेत, तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय? तुम्हाला मॉबमध्ये सोडू का?,’ अशा शब्दांत राणेंनी त्या अधिकाऱ्याला दरडावले. त्याचवेळी, प्रवीण दरेकर काहीतरी बोलू पाहत होते. दुसऱ्याच क्षणी राणेंनी त्यांनाही गप्प केलं. थांब, रे मध्ये बोलू नको… असं राणे दरेकरांना म्हणाले. त्यानंतर दरेकरही गप्प झाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वत: यावेळी उपस्थित होते. ह्या व्हिडिओची सध्या राज्यभर चर्चा आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here