सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४७६२९ रुपये प्रती १० ग्रॅम आहे. त्यात ५६ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७६८९ रुपये इतका वाढला होता. कालच्या मोठ्या घसरणीतून आज चांदी सावरली आहे. आज चांदीचा भाव २७९ रुपयांनी वधारला असून तो ६६३३५ रुपये झाला आहे.
एमसीएक्सवर मंगळवारी बाजार बंद होताना सोने ६३ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४७५२४ रुपयांवर स्थिरावला होता. चांदीमध्ये मात्र १००१ रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव ६६११२० रुपयांवर बंद झाला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी सोने दरात घसरण झाली आहे. आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६५० इतका आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७६५० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०३० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१३० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (२६ जुलै २०२१) २९ हजार ६८९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १४ लाख ४० हजार ९५१ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, भारतात तब्बल १३२ दिवसानंतर करोना संक्रमित रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी आढळलीय. देशात सध्या ३ लाख ९८ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख २१ हजार ३८२ वर पोहचलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times