परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावचे आहेत. त्यामुळे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने तेथे जाऊन सुमारे तीन तास कसून केली. पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईकांची माहिती मिळाल्याने पथकाने येथे येऊन चौकशी केली. भुजबळ यांच्या येथील नातेवाईकांचे जवाब नोंदवून ही पथके परत गेली.या चौकशीतून अधिकार्यांच्या हाती काय लागले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही.
वाचा:
सिंग यांनी पाठविलेल्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या मुंबईतील सरकारी निवास्थानी सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळही हजर असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे भुजबळ यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या मूळ गावाची माहिती मिळाल्यानंतर हे पथक येथे आले. मात्र, मुंबईतच वास्तव्यास असलेल्या भुजबळ यांचा मूळ गावाशी फारसा संपर्क नाही. तरीही ईडीने आपली औपचारिकता पूर्ण केली असावी, असे बोलले जात आहे. या कारवाईसंबंधी अधिकृतपणे पोलिस किंवा इडीकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिकांनाही हे पथक येऊन गेल्यानंतरच कळाले. त्यानंतर या चौकशीची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times