बोम्मई यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हेदेखील उपस्थित होते. राजीनामा द्यावा लागल्यानंतर येडियुरप्पा नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं, त्यामुळेच त्यांची या कार्यक्रमात उपस्थिती महत्त्वाची ठरली. या कार्यक्रमात भाजपचे अनेक केंद्रीय आणि राज्यातील नेते उपस्थित राहिले.
शपथविधीपूर्वी बोम्माई यांनी केंद्रीय भाजपा निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री तसंच माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचीही भेट घेतली.
तसंच शपथग्रहण सोहळ्यापूर्वी बोम्मई हे मारुती मंदिरात दर्शनासाठी पोहचलेले दिसले. यावेळी, आज शपथग्रहणानंतर कॅबिनेटची एक बैठक घेणार तसंच राज्यातील कोविड आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार असल्याचं बोम्मई यांनी म्हटलं.
बोम्मई हे येडियुरप्पा यांचे शिष्य आणि अत्यंत जवळचे मानले जातात. विधिमंडळाच्या बैठकीतही बोम्मई यांच्या नावाचा प्रस्ताव येडियुरप्पा यांच्याकडूनच मांडण्यात आला होता. तसंच जनता दलातून बोम्मई यांना भाजपमध्ये आणण्यातही येडियुरप्पांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती.
६१ वर्षीय बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरलेत. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी राज्याच्या २२ मुख्यमंत्र्यांपूर्वी केवळ तीन मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times