मेष : आप्तेष्टांशी केलेले उधारीचे व्यवहार पूर्ण करा. मनोबल उत्तम राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत.
वृषभ : छोट्या मुलांमध्ये वेळ घालविल्याने काही काळ तणावमुक्त राहाल. प्रलंबित येणी प्राप्त होतील. स्वत:ची बाजू सक्षमपणे मांडू शकाल.
मिथुन : खेळकर स्वभावामुळे लोकप्रियता मिळेल. आप्तेष्टांच्या साहाय्याने व्यवसायात फायदेशीर करार कराल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : उत्साहाने कार्यरत राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल.
सिंह : महत्त्वाचे विषय मार्गी लावाल. नवे प्रकल्प पूर्णत्वास जातील. मुलांच्या यशाने भारावून जाल.
कन्या : स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचा विचार कराल. सामाजिक कार्यक्रमात मांडलेल्या विचारांमुळे प्रसिद्धी मिळेल. मानसन्मान होतील.
तुळ : आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. पदाधिकारी अथवा प्रतिष्ठीत व्यक्तींच्या ओळखी होतील. फावल्या वेळेत एखादी अडचण दूर कराल.
वृश्चिक : आनंददायी दिवस. अनेक उत्साहवर्धक घडामोडी घडतील. व्यक्तीमत्त्व आकर्षित होईल.
धनु : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात प्रसन्न वाटेल. स्वत:तील गुणदोषांविषयी चिंतन कराल.
मकर : आवडत्या व्यक्तीकडून आकर्षक भेटवस्तू मिळेल. प्रत्येक वेळी शंका उपस्थित करण्याच्या सवयीमुळे एकटे पडाल. ज्येष्ठांशी आदराने वागा.
कुंभ : जोडीदाराबरोबरचे नाते निकोप असेल. आर्थिक चणचण भासणार नाही. संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर मौज करावीशी वाटेल.
मीन : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याला तत्परतेने मदत कराल. जवळच्या व्यक्ती महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवतील. धनलाभ होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times