नाशिक: मुंबई, पुणे व नाशिकसह मोठ्या शहरांतील महापालिका निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. शहरी भागांमध्ये प्रभाव असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष यांनी मुंबईनंतर पुणे व नाशिकवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिकची जबाबदारी राज यांचे चिरंजीव व मनसेचे युवा नेते यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करून पक्ष संघटनेचा आढावा घेतला होता. अमित ठाकरे हे देखील त्यावेळी तडकाफडकी नाशिकला पोहोचले होते. त्याचवेळी त्यांच्याकडं नाशिकची जबाबदारी दिली जावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, राज ठाकरे यांनी या संदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमित ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. मनसे संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील त्यांच्या सोबत आहेत. ‘राजगड’ या मनसे कार्यालयात अमित ठाकरे हे इतर नेत्यांसोबत पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या मुलाखती घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला जाणार आहे.

वाचा:

नाशिक हे राज ठाकरे यांचं आवडतं शहर आहे. शिवसेनेत असतानाही राज यांचं नाशिकवर विशेष लक्ष असायचं. तेथील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळंच शिवसेना सोडल्यानंतर त्यांना नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची भक्कम साथ लाभली होती. नाशिकनंच मनसेला महापालिकेची पहिली सत्ता दिली. आमदार दिले. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपला चांगले दिवस आले व नाशिकची सत्ता मनसेच्या हातून गेली. त्यानंतर अनेक शिलेदारही मनसेला सोडून गेले. हा गड पुन्हा एकदा काबिज करण्याच्या दृष्टीनं आता मनसेनं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं राज यांनी अमित ठाकरे यांना इथं लक्ष घालण्याचे आदेश दिल्याचं समजतं. अर्थात, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here