भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक आहे आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री #workFromHome करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकलप्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.
वाचाः
मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
वाचाः
पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी
मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times