यवतमाळः ठाकरे सरकारविरोधात () अक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणं एका एसटी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्रविण ज्ञानेश्वर लढी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. यवतमाळ आगारात तो कार्यरत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात त्यानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. हा मजकूर पाहून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्रविण लढी यांनी व्हॉट्सअॅपवर महाविकास आघाडी सरकार व अनिल परब यांच्याविरोधात पोस्ट केली होती. तसंच, सरकारचा उल्लेख महावसुली खंडणीखोर असा केला होता. महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटकेस्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. पण ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार, अशी पोस्ट एसटी कर्मचाऱ्यानं केली होती.

वाचाः

तसंच, संबंधित कर्मचारी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै २०२१ पासून या कर्मचाऱ्याचे एसटी सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. या कालावधीत नियमाप्रमाणे या कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता दिला जाणार आहे, असे एसटी महामंडळाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here