खेड : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये महापुराने थैमान घातले. नुकसानीचे घरपट्टी पावतीनुसार नको तर रेशनकार्ड निहाय नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या नेतृत्वाखाल यांच्या शिष्टमंडळाने आमदार योगेश कदम यांच्याकडे निवेदन देऊन केली.

याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना आमदारांनी सूचना दिल्या आहेत व तसे निर्देश जिल्हाधिकारी यांनी खेड तालुका प्रशासनाला दिल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी दिली. यावेळी जावेद कौचाली, अनस पोत्रिक, दाऊद कादीरी, वहाब चौगुले उपस्थित होते.

खेड शहरातील अतिवृष्टीमुळे महापुराचे पाणी बाजारपेठ परिसरात व अनेक घरात शिरल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले. खेड शहरपरिसरात खांब तळे, जगबुडी नदीकिनारी असलेला पोत्रिक मोहल्ला झोपडपट्टी, सोनारआळी, बारदान गल्ली, हेडगेवार वसाहत, तीनबत्ती नाका, पोत्रिक, पटेल-तांबे मोहल्ला, ब्राह्मण आळी, वालकी गल्ली, पानगल्ली, गुजर आळी, गांधीचौक, निवाचा चौक आदी भागात पुरसदृश परिस्थितीत निर्माण होऊन को्टयावधीचे नुकसान झाले आहे.

खरंतर, कोकणातील रायगड, रत्नागिरी, चिपळूण या जिल्ह्यात महापूरामुळे हाहाकार माजला होता. दरड कोसळून अनेक भीषण दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांच्या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य अखेर सोमवारी थांबवण्यात आलं. चिपळूण, महाडसह महापुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here