पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे सडेतोड आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. या वेळी त्यांचे चित्रिकरण करणाऱ्या कॅमेरामनबाबत राज ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य करत मी काय कुंद्रा आहे का?, अशी टिप्पणी केली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज ठाकरे मनसेच्या पुणे कार्यालयात दाखल झाल्यानंतर कॅमेरामननी त्यांना गराडा घातला. राज ठाकरे सोफ्यावर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. काही अर्ज-विनंत्या पाहत होते. त्यावेळी कॅमेरामन देखील त्यांचे शूटिंग करत होते. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. बराचवेळ कॅमेरामन शूटिंग करत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी कॅमेरामनना हटकले.

क्लिक करा आणि वाचा-
कॅमेरामन हटत नाहीत हे पाहून राज ठाकरे त्यांच्याकडे पाहून हसले. ते म्हणाले की माझं सगळं कान, नाक शूट करून सगळं झालं का?… किती वेळ तेच तेच घेता रे…? मी काय कुंद्रा आहे का?… असा टोला राज यांनी लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

क्लिक करा आणि वाचा-
सन २०२२ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज आता पुणे महापालिका निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले असून ते संघटनेच्या बांधणीवर भर देत आहेत. राज यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे मुक्कामी असणार आहेत. या तीन दिवसांत राज पक्षाच्या शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष अशा कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या नेमणुका जाहीर करणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे हे विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशीही देखील संवाद साधणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here