मुंबई । विनय दळवी

‘दाऊदचा गेम करण्यासाठी कराचीतील एका दरग्याहबाहेर आम्ही १० जणांनी कित्येक दिवस फिल्डिंग लावली होती. पण नेपाळचा खासदार मिर्झा दिलशाद बेग यानं ऐनवेळी टीप दिल्यानं हा प्लान फसला,’ अशी माहिती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला गँगस्टर यानं दिली आहे.

वाचा:

एकेकाळी दाऊदचा विश्वासू साथीदार असलेला व नंतर छोटा राजनच्या गटात गेलेला लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ८ जानेवारी रोजी पाटण्यातून अटक केली होती. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान त्यानं अंडरवर्ल्डमधील अनेक कारवायांची माहिती पोलिसांना दिली. ‘भारतीय गुप्तचर संस्थांच्या मदतीनं १९९८ साली छोटा राजन यानं दाऊदचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदच्या मुलीचा, मारियाचा मृत्यू झाल्यानंतर काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी तो कराचीच्या एका दरग्यात जाणार होता. तिथंच त्याला मारायचा प्लान ठरला होता. त्यासाठी दहा जणांची एक टीम बनवण्यात आली होती. त्यात फरिद तनाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि मी स्वत: होतो. नानाचा खास शूटर विकी मल्होत्रा हा आमचा म्होरक्या होता. आम्ही सर्वांनी दरग्याहच्या बाहेर तळ ठोकला होता. मात्र, मिर्झा बेगनं दाऊदला शेवटच्या क्षणी खबर दिली आणि आमचा प्लान फसला. त्यामुळं संतापलेल्या छोटा राजननं त्याच वर्षी बेगला संपवलं, असं लकडावाला यानं सांगितलं.

वाचा:

लकडावाला जवळपास २० वर्षे मुंबई पोलिसांना गुंगारा देत होता. त्या दरम्यान त्यानं आधी दाऊद व नंतर छोटा राजन गँगसोबत काम केलं. त्यानंतर स्वत:ची गॅंग बनवून देशभर खंडणीखोरांचं जाळं उभारलं. बनावट पासपोर्ट प्रकरणात गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात मुलगी शिफाला अटक झाल्यानंतर लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

वाचा:

२००२ साली दाऊद आणि छोटा शकीलनं त्याचा गेम करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, त्या गोळ्या गळ्यातील ताविजाला लागल्यामुळं तो वाचला, अशी माहिती त्यानं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here