: विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी बुधवारी सातारा जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करणं टाळत ही वेळी राजकारण करण्याची नसून उपाययोजना करण्याची आहे, असं म्हण राज्य सरकारकडे पुराने बाधित झालेल्या गावांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.

‘आर्थिक साह्य किती येणार आहे हे मला माहीत नाही. मात्र दुर्घटनाग्रस्त लोकांची कायमस्वरुपी व्यवस्था शासनाने करावी. अशा संकटाच्या वेळी राजकीय गोष्टी करत बसून कोण कमी पडलंय हे बघण्यापेक्षा पीडितांना मदत करणं गरजेचं आहे. अशावेळी राजकारण करु नये, हा संवेदनशील विषय आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूरग्रस्तांसाठी फडणवीसांची सरकारकडे मागणी
‘अतिवृष्टी, भूस्खलन आणि एकूणच पूरपरिस्थितीने पाटण तालुक्यात मोठे संकट कोसळलं आहे. लोक भयभीत झाले आहेत. या भयग्रस्त लोकांचे तातडीने एकत्रित पुनर्वसन व्हावे व पुनर्वसन करण्यासाठी चांगली योग्य जागा बघून घर बांधावीत. सध्या पीडित लोकांची मदतीने व्यवस्था होत असली तरी हे फार काळ चालणार नाही. त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावीच लागेल आणि त्याबाबत जास्त भर दिला गेला पाहिजे,’ अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथील भूस्खलन पीडित लोकांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हेही उपस्थित होते.

‘अतिवृष्टीने दरड कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहे. या दुर्घटनेनंतर लोक भयभीत झाले आहेत. सध्या या लोकांची व्यवस्था व्यवस्थित होत आहे. मदत, किट्स मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. जेवणाची व्यवस्था होत आहे, पण हे फार काळ चालणार नाही. या लोकांची कायमस्वरुपी व्यवस्था करावीच लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देता येईल का हे पाहिले पाहिजे,’ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here