वाचा:
राज्यातील ३६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे तर बाकीच्या २५ जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी रेट खूपच कमी झाला आहे. ही स्थिती दिलासा देणारी असून पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेले जिल्हे अनलॉक करण्याच्या दिशेने राज्य सरकार ठोस पावले टाकत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली. त्यात निर्बंध शिथील करायचे तर त्याचे स्वरूप काय असायला हवे, यावरही विचार करण्यात आला. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली व त्यात मुंबईतील लोकलसेवेबाबत लवकरच दिलासा देण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.
वाचा:
मुंबईतील लोकलसेवा सामान्य प्रवाशांसाठी कधी खुली केली जाणार असे विचारले असता टोपे यांनी त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोविड स्थिती नियंत्रणात आहे तिथे निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याचा विचार करत असतानाच मुंबईतील लोकलसेवेबाबतही सकारात्मक विचार करण्यात येत आहे. कोविडवरील लसचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यायला हरकत नाही, असे आम्हालाही वाटत आहे. त्यादृष्टीने विचार सुरू असून याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांचाच असेल असे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे ज्यांचे पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी लोकलची दारे उघडतील अशी आशा बळावली आहे.
वाचा:
दरम्यान, करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांत निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्य विभागाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. हा अहवाल आज किंवा उद्या सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेणार असून यासोबतच लोकलबाबतही निर्णय होणार का, याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे. हा निर्णय तातडीने व्हावा, अशी मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची आधीपासूनच मागणी आहे. मुंबई आणि परिसरात ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय लोकल सामान्य प्रवाशांसाठी खुली केली जाऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times