३० सप्टेंबर २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गाचा ग्रोथ रेट १. ३१ टक्के इतका होता. ३० एप्रिल २०२१मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत करोनाच्या ग्रोथ रेटमध्ये वाढ होऊन १. ४५ पर्यंत पोहोचला होता. राज्य सरकारने लावलेल्या कठोर निर्बंध आणि कडक नियमांमुळं आता करोना संसर्गाचा ग्रोथ रेट ०.०५ टक्के इतका आहे. १८ एप्रिलमध्ये राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण सापडले होते. ६८ हजार ६३१ या आजपर्यंतचा करोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक होता. मात्र, आता करोना रुग्णांच्या संख्येत उतार येत आहे. गेल्या महिन्याभरापासून रोज ६ ते ७ हजार रुग्ण समोर येत आहेत.
वाचाः
देशात अव्वल
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, करोनावर मात केलेल्या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात रुग्ण दुप्पटीचा कालावधी ५९६ दिवसांवर आला आहे. तर, महाराष्ट्रात ६५२. ९९ दिवसांवर रुग्ण दुपट्टीचा कालावधी येऊन ठेपला आहे. पहिल्या लाटेत ३० सप्टेंबर २०२०मध्ये राज्यात रुग्ण दुपट्टीला कालावधी ५३. २२ दिवस इतका होता. तर, ३० एप्रिल २०२१मध्ये रुग्ण दुपट्टीचा कालावधीत घट होऊन ४८ दिवसांवर आला होता.
वाचाः
करोना संसर्ग झालेल्या रुग्णही झपाट्याने बरे होत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५४ टक्के इतका आहे. ७ महिन्यांपूर्वीच हा दर ७८ टक्क्यांवर होता. लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर मृतांच्या संख्येतही घट होत आहे. मृत्यूदरही २.१ टक्के इतका आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times