मुंबईः चिपळूण, महाडमध्ये महापुरानं थैमान घातल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ()विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोकणात पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री () यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्यानं राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री ()यांनी अप्रत्यक्षरित्या राणेंवर निशाणा साधला आहे. प्रत्येकाला पूरस्थितीची पाहणी करण्याचा अधिकार आहे. पण अधिकारी असले पाहिजेत अशी अपेक्षा करु नये, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, प्रातअधिकारी जे कोमी अधिकारी असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच गेले पाहिजे. मग कोणीही मुख्यमंत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद दूर ठेवायचे असतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी कुठे आहेत, अशी विचारणी केली नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच, अरे तुम्ही जिल्हाधिकारी, प्रांत अधिकाऱ्यांना पाहायला आलात की नुकसानीची पाहणी करायला. तुम्हाला अधिकाऱ्यांना काही सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,’ अशा शब्दांत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाचाः

‘काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अनेक मोठे व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांच्या काळात कधीही, कोणीही, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुद्गार काढले नव्हते,’ असंही पवारांनी म्हटलं आहे.

वाचाः

पूर्ण पाणी कमी झाल्याशिवाय शेतांची अवस्था कळू शकत नाही. पाणी ओसरलं आहे तिथे पंचनामे सुरु आहेत. त्यानुसार मदत केली जाईल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. तसंच, विरोधकांसह सर्वांनी जिल्हाधिकारी, प्रांत, मामलेदारांना आपली काम करु द्यावी असं आवाहन केलं. वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो, असं पवारांनी म्हटलं आहे. तसंच, मी कोणाचंही नाव घेऊन बोलत नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here