चित्रा वाघ यांनी खासदार राऊत यांना ट्विट करत हे प्रत्युत्तर दिले आहे. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, संजय राऊत यांनी पेगॅससची चिंता करण्यापेक्षा ”ची चिंता करावी. आज ज्या युवराच्यांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळे ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठ्याचा ठेका दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाईबाबत आणि गचाळ कारभाराबाबत फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला,असे नमूद करतानाच असे का आणि कोणासाठी केले गेले असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
खासदार संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले होते?
संजय राऊत यांनी रोकठोक या सदरातून, तसेच अग्रलेखातून पेगॅससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. पेगॅसस हे हेरगिरीचे प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय असल्याचे वाटते. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशातील जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसले असते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times