दापोली : दापोली तालुक्यातील उन्हवरे-फरारे येथील भुदरवाडी खाडी किनारी एका अंदाजे ४५ वर्षे वयाच्या इसमाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या नावाचं टी-शर्ट घातलेलं होतं.

बुधवारी २८ जुलै रोजी ही घटना घडली आहे. याची माहिती मिळताच अहमद खोत यांनी दापोली पोलीस ठाण्यात घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इसमाचा चेहरा कुजल्याने ओळख पटवण्यास अडचण निर्माण होत आहे. मृतदेहाच्या अंगावर फक्त मा. आमदार संजयराव कदम राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिलेला टी-शर्ट असल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकातून देण्यात आली आहे.

या घटनेची नोंद सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हळदे करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here