नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे अशा राज्यातील १२ महापालिकांच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा निवडणूक प्रचारात सक्रिय झाले आहेत. शहरी भागांमध्ये प्रभाव असलेल्या मनसेने या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेहे सुद्धा सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून बसले आहेत. प्रसार माध्यमांसोबत बोलताना त्यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
वाचाः
राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून, नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे. मनसे काळातील प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी. तशी मागणी नाशिक महापालिका आयुक्तांना केली आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
वाचाः
मनसेच्या कामावर भाजपची पोळी
सत्ताधारी भाजप मनसेनं राबवलेले प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवते. मनसेच्या कामावर भाजप पोळी भाजून घेतेय, असा आरोप यावेळी संदीप देशपांडे यांनी केला आहे. तर, पालिकेच्या अभियत्यांनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times