मुंबई: शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद नवा नसला तरी, केंद्रीय मंत्री यांनी चिपळून दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. राणे यांनी टीका केल्यानंतर राणेपुत्र आमदार आणि हे देखील सक्रिय झाले. यानंतर दोन्ही बाजूंनी वाकयुद्ध रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या राणे-शिवसेना वादात आता शिवसेनेचे कोकणातील नेते यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेला शिव्या देऊनच नारायण राणे यांनी आपले अस्तित्व टिकवले असल्याचा टोला लगावत जाधव यांनी राणेपुत्रांवरही निशाणा साधला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव बोलत होते. राणे कुटुंबीयांवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, नारायणराव राणे यांना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलांबाबत काय सांगावे….. महाराष्ट्रात अशी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत, असेच प्रत्येक आईबापाला वाटेल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे आणि अशा सुसंस्कृत आणि थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यात पक्ष आणि मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, पण आपण कोणाबाबत कोणती भाषा वापरतो याचे जराही भान राखले जात नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत जाधव यांनी राणेपुत्रांवर टीकेचे प्रहार केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

‘राणेंबद्दल बोलण्याची माझी ईच्छाही होत नाही’

आपण मात्र कोणाबाबत काहीही भाषा वापरायची आणि दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही, असे सांगताना जी अशी मुलं आहेत त्यांच्या बद्दल बोलण्याची किंवा खुद्द नारायण राणे यांच्याबद्दल बोलायची माझी जरा सुद्धा इच्छा होत नाही, असे भास्कर जाधव पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
नारायण राणे यांनी ९ आमदारांना सोबत घेऊन शिवसेना सोडली होती. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा एकही समर्थक आमदार निवडून आला नाही. इतकेच नाही, तर पुढच्या निवडणुकीत ते स्वत: तरी निवडून आले का?, किंवा त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का?…. किंवा ते वांद्रे येथे उभे राहिले होते, तेथे तरी ते निवडून आले का?, असे एकावर एक सवाल उपस्थित करत आता राणेंचे अस्तित्व शिवसेना शिव्या देण्यावरच टिकले असल्याचे म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here