सांगली: सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकारने आता बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून देणे कसे चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आता राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे बोट न दाखवता स्वत: मदत करावी, असे आवाहन फडणवीस यांनी राज्य सरकारला केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तुलनेने अधिक नुकसान झाल्याचे सांगत याचे कारण जलसंपदा खात्याचा अंदाज चुकला हेच असल्याचे फडणवीस म्हणाले. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरस्थितीबाबत वडनेरे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर आणि सांगली भागात निर्माण झालेल्या परिस्थितीचा ठपका जयंत पाटील यांच्या जलसंपदा खात्यावर ठेवत असताना प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जयंत पाटील यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत पाटील यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आताउत्तम असल्याची माहिती खुद्द पाटील यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

फोन टॅपिंग प्रकरणावरून सरकारवर निशाणा
सरकारच्या सांगण्यावरूनच आपण काही फोन टॅप केले असा दावा डॉ. रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात केला आहे. त्यावरून फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. फोन टॅपिंग हे भाजपच्या सांगण्यावरून झाले असे सत्ताधारी पक्ष म्हणत आहेत. मात्र त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जेव्हा फोन टॅपिंग झाले तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. असे असताना मग आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या सांगण्यावरून कसे काय काम होऊ शकेल?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here